अन्वयार्थ आणि श्लोक ह्यांचे सविस्तर अर्थ विशद करणारी गीताप्रवचने


Main


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥




नित्य गीतासंदेश

नमस्कार. गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
आजचा संदेश श्री विजय कदम यांच्या कडून आपल्या प्रतिक्रिया त्यांना कळवाव्या ब्रम्हसूत्र विशद करताना महर्षी व्यास म्हणतात, !!ईक्षतेर्नाशब्दम!! व्यास म्हणतात, "ईक्षते" म्हणजे विचार करते, संकल्प करते. हे आपल्या आद्यावस्थेत असताना आपल्यातच रममाण झालेले असते. तिथे कोणताच विस्तार नसतो. ते एकच एकटे असते. कोणताच संकल्प तिथे स्फुरण पावलेला नसतो. म्हणजेच बाह्य दृष्टीला दिसणारा हा जगत- पसारा नसतो. याला व्यास "अशब्दम" असे म्हणतात. जेव्हा त्या ब्रम्हाच्या ठिकाणी पहिलं स्फुरण होतं, पहिला संकल्प होतो तो "ओंकार". आपल्याला भगवद्गीता जे "ओमित्येकाक्षरम" असं सांगते. ब्रम्हवाद्यांंचे कोणतेही कार्य "ओम" म्हणून होत असते. ते त्या ब्रम्हाचे आद्य स्फुरण होय. ही त्यात निर्माण झालेली पहिली क्रिया आहे. हा पहिला विकार आहे. हाच पहिला शब्द. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, "प्रणव: सर्व वेदेषु शब्द: खे" . इथे पहिल्यांदा या ओंकारातून आकाश म्हणजेच पोकळी निर्माण झाली आणि या आकाशाचा गुण आहे "शब्द". व्यास जे म्हणतात "अशब्दम" , तेव्हा हे ओंकाराचं स्फुरण झालेलं नव्हतं. म्हणून हे जगतापासून "ब्रम्ह" असण्याचे कारण होत नाही. ब्रम्ह त्याच्याही आधी आहेच. ओंकार हा त्रिगुणात्मक आहे. म्हणून तो नियंत्रित आहे. तिन्ही गुणांच्या पलिकडे ब्रम्ह आहे. तरीपण जर ब्रम्ह गाठायचं असेल तर या ओमकारस्वरुपाला हाताशी धरावं लागतं. कारण ब्रम्ह निर्विकार, निर्गुण आहे. काही साध्य करायचं असेल तर ते मुळात आकारमय असायलां हवं. म्हणून ध्यानादि क्रिया करताना " ओम" हाच ध्यानी धरायला हवा. जरी आपण म्हटलं कि; संकल्प, विचार हा प्रकृतिच्या दृष्टीनुसार केला तर ते योग्य नाही, कारण तिथे "आत्म" हा शब्द आहे. व्यास म्हणतात, "गौणश्चेन्नात्मशब्दात" . ही प्रकृती या जगाचे कारण नाही. या जगाचे कारण हे ब्रम्हच आहे. प्रकृती या जगाचा सांभाळ करते. मुलत: हे जगत त्रिगुणात्मक आहे. या गुणांच्या अधीन राहून प्रकृती नावाची व्यवस्था आहे. हिलाच "मम माया दुरत्यया: " असे भगवद्गीतेत म्हटलं आहे. म्हणून प्रकृती ही ब्रम्हवाचक नाही. ती विकारमय आहे. ब्रम्ह विकारमय नाही. यासाठी पुढचं सूत्र सांगतात, "तन्निष्ठस्य मोक्षोपदेशात" या ब्रम्हाच्या ठिकाणी स्थित असणारी "मुक्ती" सांगितली आहे. मोक्ष तेव्हाच, जेव्हा ब्रम्हप्राप्ती होईल. प्रकृती मोक्षाचे कारण नसून ते बंधाचे कारण आहे. प्रकृती स्वत:चे काहीच निर्माण करीत नाही. ब्रम्हच आपल्या स्वत:ला त्रिगुणात्मक मायास्वरूपात प्रकट करतं. म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी " नि: स्त्रैगुण्यो भवार्जुन" असं भगवंत म्हणतात. आत्मप्राप्ती म्हणजेच मोक्ष. म्हणून "आत्मा" हा शब्द जो काही योजिला आहे तो ब्रम्हवाचक आहे. आपण व्यवहारातसुद्धा स्वत: विषयी "आत्म" हा शब्दप्रयोग करतो. आपल्याहून भिन्न पदार्थासाठी, उदा. पुस्तक, झाड, घर इत्यादीसाठी "आत्म " हा शब्द योजित नाही. म्हणून दिसते ते ब्रम्ह नसून त्यात ब्रम्ह समाविष्ट आहे. ते जाणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, "मंथूनी नवनीता तैसे घे अनंता! वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु!!" !!हरीओम !!
आणखी वाचा ....

आणखी वाचा ....

पुस्तकांबद्दल माहिती

श्रीमद् भगवद् गीता हा केवळ ग्रंथ नसून ते एक जीवनदर्शक आहे. गेल्या पाच हजार वर्षात माणसामध्ये अनेक बाह्य बदल झाले. पण त्याचे अंतरंग त्याचे विचार आणि वर्तन ह्यांत काही बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह मद, मत्सर, भीती, इर्षा, स्पर्धा, पैसा, आणि उपभोग यांसाठी तीच जीवघेणी भांडणे, हेच वास्तव कायम आहे: आणि म्हणूनच जीवनात गीता उतरवणे आजही महत्वाचे आहे.

श्रीमद् भगवद् गीता हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. कोणतेही तत्वज्ञान जर रोजच्या जीवनात उपयोगी नसेल, तर ती निवळ सात्विक करमणूक ठरते. श्रीमद् भगवद् गीता हे केवळ कोरडे तत्वज्ञान किंवा केवळ सिद्धांत नाही तर ते सिद्धांत जीवनात कसे उतरवावेत ह्याचे साधे सोपे आणि व्यावहारिक साधनही सांगते. हेच ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. आपले आजचे जीवन अधिक समाधानाने, शांततेने आणि आनंदाने कसे जगावे आणि त्याचबरोबर ते सुधारण्याचा योग्य प्रयत्न कसा करावा हे सांगणारा विलक्षण ग्रंथ आहे.

Khand 1
खंड १ (अध्याय १ ते ३)

(५२८ पाने)
किंमत रु ३००/-

Khand 2
खंड २ (अध्याय ४ ते ६)

(६६१ पाने)
किंमत रु २५०/-

Khand 3
खंड ३ (अध्याय ७ ते ९)

(५२० पाने)
किंमत रु ३००/-

Khand 4
खंड ४ (अध्याय १० ते १२)

(५९२ पाने)
किंमत रु २५०/-

Khand 5
खंड ५ (अध्याय १३ ते १५)

(६८० पाने)
किंमत रु ३००/-

Khand 6
खंड ६ (अध्याय १६ ते १८)

(५७६ पाने)
किंमत रु ३००/-

Nitya Chintanmala
नित्य चिंतनमाला भाग १

( ५६० पाने )
किंमत रु ३००/-

Nitya Chintanmala
नित्य चिंतनमाला भाग २

( २५६ पाने )
किंमत रु २००/-




Main

किंमत रु २,७००/- ( सवलतीच्या दरात )

आपण सर्वजण आपल्या आप्तस्वकीयांना, स्नेहीजनांना काहीतरी भेट पाठवतो. हीच भेट आपण ग्रंथरूपात पाठवू शकतो. ही भेट प्रत्येकासाठी सर्वार्थाने उपयोगी व जीवन बदलून टाकणारी ठरेल. काकांचे गीतेवरील सर्व सहा खंड "भगवद्गीता चिंतनमाला" व नवीन प्रकाशित झालेली "नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरूकिल्ली )" भाग - १ व भाग - २ ही सर्व पुस्तके यांचा आम्ही एक संच तयार केला आहे. एवढंच नाही तर या सर्व ग्रंथांना एकत्रित ठेवण्याकरता एक सुंदर आकर्षक बॉक्सही तयार केला आहे जो प्रत्येकाला आपल्या घरात दर्शनी भागात ठेवता येईल. या सहा ग्रंथांसह "भगवंताकडे वाटचाल" आणि "श्री महादेवी स्तोत्र" ही दोन पुस्तकं विनामूल्य दिली जातील. या सर्व संचाची एकत्रित किंमत सवलतीच्या दरात फक्त रु २,७००/- एवढी आहे. सबंध भारतात कुठेही, एवढंच नव्हे तर परदेशीही आपण कळवाल त्या पत्यावर हा संच कुरिअर करू. कुरिअरचे पैसे प्रत्यक्षात जे असतील ते आम्ही आपल्याला कळवू. ते आपल्याला द्यावे लागतील. ठाणे, पुणे आणि चिपळूण इथे ही घरपोच सेवा मोफत उपलब्ध आहे.




नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरुकिल्ली )

गेली दोन वर्ष काका रोज सकाळी सर्वांना जो संदेश पाठवत होते त्या संदेशांचं संकलन म्हणजे ही दोन पुस्तके
आम्ही जेव्हा संकलन सुरू केले तेव्हा साधारण हजार पानांपेक्षा जास्त पानं होत असल्याचं लक्षात आल्यामुळे ही पुस्तके दोन भागात करत आहोत. आता हे दोन्ही भाग प्रकाशित झाले आहेत . यात पहिली ७० पानं हा काकांचा जीवन प्रवास आणि त्यानंतर काका पाठवत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांचे विचार असं या पहिल्या भागाचं स्वरुप आहे. काकांचा जीवनप्रवास खरोखरच अद्भुत आणि अलौकिक आहे. जीवनाच्या प्रत्येक मार्गावर आलेल्या संकटांना स्थितप्रज्ञ राहून कसं तोंड द्यावं याचं उत्तर या जीवनप्रवासात आपल्याला मिळेल. हा जीवन प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकांची अजून एक खासियत म्हणजे आपण पुस्तकाचं कोणतंही पान काढलंत तर आपल्या मनामध्ये त्या दिवशी जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्या पानावर मिळतं.

नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरुकिल्ली ) : भाग - १

Main

( ५६० पाने ) - किंमत रु ३००/-

नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरुकिल्ली ) : भाग - २

Main

( २५६ पाने ) - किंमत रु २००/-





अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा

ठाणे : मिलन मुसळे : +91 7506507568 / मीनल मोरबाले : +91 7506507569

पुणे : सुग्रीव शिंदे : +91 9004096935 / हिमांशू जोशी : +91 9004096941

चिपळूण : श्री. संजय चितळे : +91 9420474392

आपण सर्व मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भगवद्गीता पोचवण्याचा संकल्प करूया.
|| हरी ॐ ||



bhagavad gita pravachan, bhagavad gita slokas, bhagavad gita slokas chapter , bhagavad gita slokas audio, bhagavad gita saar , Bhagavad Gita Bodh, Bhagavad Gita online, Bhagavad Gita in Marathi, Srimad Bhagavad Gita , bhagavad gita chintanmala, Adhyaya 1st Shloak, Bhagavad gita chintanmala khand, Bhagavad gita online, Bhagavad Gita online audio

श्रीमद भगवद गीता, भगवद गीता, भगवद गीता श्लोक , भगवद गीता श्लोक अध्याय , भगवद गीता श्लोक ध्वनी , भगवद गीता सार , भगवद गीता बोध , भगवद गीता ऑनलाईन , भगवद गीता मराठी , भगवद गीता चिंतनमाला , भगवद गीता ऑनलाईन ध्वनी , भगवद गीता अध्याय १ ते १८, भगवद गीता चिंतनमाला खंड