अन्वयार्थ आणि श्लोक ह्यांचे सविस्तर अर्थ विशद करणारी गीताप्रवचने


Main


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥




नित्य गीतासंदेश

नमस्कार. गीताप्रेमी साधकहो,
सुप्रभात!
मंडळी, शास्त्र स्पष्टपणे असं सांगतं की, आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये तीन प्रकारचे दोष असतात. १) मल २) विक्षेप ३) आवरण. अगदी थोडक्यात मल म्हणजे मनाची अस्वस्थता. मनामध्ये अनेक प्रकारच्या आवडीनावडी असल्यामुळे मन अनेक वेळा अस्वस्थ राहतं. अगदी साधं. प्रवचनाला गेलात, तुमच्या नेहमीच्या जागी दुसरंच कुणीतरी बसलं आहे, झालं मन अस्वस्थ होतं की नाही? हा आहे मल. दुसरा विक्षेप. त्याच मनात चंचलतापण आहे. मन एका विषयात फार काळ रमत नाही. या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत राहतं. ही जी चंचलता आहे तो आहे विक्षेप. आणि तिसरं आवरण, झाकण, पडदा. आधीच्या दोन अवस्था, मनाची अस्वस्थता आणि चंचलता, त्यांमुळे आपण वस्तुतः आत्मा असूनही, आणि आत्मा २४ तास आपल्याजवळ असूनही त्याचं दर्शन, त्याची जाणीव आपल्याला होत नाही, हे आहे आवरण. मनातली ही अस्वस्थता नष्ट करण्यासाठी निष्काम कर्मयोग ही साधना गीता सांगते. मनातले विक्षेप, चंचलता कमी करण्यासाठी उपासना करणं आवश्यक असतं आणि या दोन साधनांनी अंतःकरण शुद्ध झालं की, 'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया'. मग सद्‌गुरूंना मनोभावे शरण जाऊन शास्त्रांचा अभ्यास, चिंतन, मनन अशा मार्गांनी आणि गुरुकृपेने आत्मज्ञान होतं. हा आहे प्रवास. यामध्ये प्रत्येक पायरीला महत्त्व आहेच की. हे झालं 'तू' शब्दाबद्दल विवेचन. आता पुढे. अज्ञान आहे आपल्या स्वरूपासंबंधी, म्हणजे काय? तर फक्त फरक आहे जाणण्याचा. नवीन काही प्राप्त करायचं नाही. आज आमचं ज्ञान आहे, मी म्हणजे हा देह. आता हे ज्ञान नसून अज्ञान आहे. हे कसं जाईल ? तर मी देह नाही या विचाराने. म्हणजेच ज्या विषयाचं अज्ञान असतं ते त्याच विषयाच्या ज्ञानाने नष्ट होतं, आणि हा आपला सर्वांचा अनुभव आहे. अगदी रोजच्या व्यवहारातलासुद्धा. समजा मला गणित कठीण जातं, त्याचं अज्ञान आहे. तर मी संगीताचा अभ्यास करून माझं गणिताचं अज्ञान नाही जाणार. कदाचित वाढेल. कारण संगीताचा संबंध आहे प्रेमाशी, भावनेशी, आणि गणिताचा आहे बुद्धीशी. तेव्हा ते अज्ञान घालवण्यासाठी गणिताचाच अभ्यास करावा लागेल. या ठिकाणी भगवंत अशा व्यक्तीबद्दल सांगताहेत की, ज्याचं स्वस्वरूपाचं अज्ञान नष्ट झालेलं आहे. कशामुळे ? स्वस्वरूपाच्या अभ्यासामुळे, ज्ञानामुळे. म्हणजे मग हे कसं झालं, ही विचार करण्याची पद्धत काय आहे; ते जाणलं आणि तसा विचार केला, तर आपलीही प्रगती ज्ञानप्राप्तीकडे होऊ शकेल.असो. अधिकचा विचार उद्याच्या *जीवनगीतेत* करूया.
आणखी वाचा ....

आणखी वाचा ....

पुस्तकांबद्दल माहिती

श्रीमद् भगवद् गीता हा केवळ ग्रंथ नसून ते एक जीवनदर्शक आहे. गेल्या पाच हजार वर्षात माणसामध्ये अनेक बाह्य बदल झाले. पण त्याचे अंतरंग त्याचे विचार आणि वर्तन ह्यांत काही बदल झाला नाही. आजही तेच काम, क्रोध, लोभ, मोह मद, मत्सर, भीती, इर्षा, स्पर्धा, पैसा, आणि उपभोग यांसाठी तीच जीवघेणी भांडणे, हेच वास्तव कायम आहे: आणि म्हणूनच जीवनात गीता उतरवणे आजही महत्वाचे आहे.

श्रीमद् भगवद् गीता हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. कोणतेही तत्वज्ञान जर रोजच्या जीवनात उपयोगी नसेल, तर ती निवळ सात्विक करमणूक ठरते. श्रीमद् भगवद् गीता हे केवळ कोरडे तत्वज्ञान किंवा केवळ सिद्धांत नाही तर ते सिद्धांत जीवनात कसे उतरवावेत ह्याचे साधे सोपे आणि व्यावहारिक साधनही सांगते. हेच ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. आपले आजचे जीवन अधिक समाधानाने, शांततेने आणि आनंदाने कसे जगावे आणि त्याचबरोबर ते सुधारण्याचा योग्य प्रयत्न कसा करावा हे सांगणारा विलक्षण ग्रंथ आहे.

Khand 1
खंड १ (अध्याय १ ते ३)

(५२८ पाने)
किंमत रु ३००/-

Khand 2
खंड २ (अध्याय ४ ते ६)

(६६१ पाने)
किंमत रु २५०/-

Khand 3
खंड ३ (अध्याय ७ ते ९)

(५२० पाने)
किंमत रु ३००/-

Khand 4
खंड ४ (अध्याय १० ते १२)

(५९२ पाने)
किंमत रु २५०/-

Khand 5
खंड ५ (अध्याय १३ ते १५)

(६८० पाने)
किंमत रु ३००/-

Khand 6
खंड ६ (अध्याय १६ ते १८)

(५७६ पाने)
किंमत रु ३००/-

Nitya Chintanmala
नित्य चिंतनमाला भाग १

( ५६० पाने )
किंमत रु ३००/-

Nitya Chintanmala
नित्य चिंतनमाला भाग २

( २५६ पाने )
किंमत रु २००/-




Main

किंमत रु २,७००/- ( सवलतीच्या दरात )

आपण सर्वजण आपल्या आप्तस्वकीयांना, स्नेहीजनांना काहीतरी भेट पाठवतो. हीच भेट आपण ग्रंथरूपात पाठवू शकतो. ही भेट प्रत्येकासाठी सर्वार्थाने उपयोगी व जीवन बदलून टाकणारी ठरेल. काकांचे गीतेवरील सर्व सहा खंड "भगवद्गीता चिंतनमाला" व नवीन प्रकाशित झालेली "नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरूकिल्ली )" भाग - १ व भाग - २ ही सर्व पुस्तके यांचा आम्ही एक संच तयार केला आहे. एवढंच नाही तर या सर्व ग्रंथांना एकत्रित ठेवण्याकरता एक सुंदर आकर्षक बॉक्सही तयार केला आहे जो प्रत्येकाला आपल्या घरात दर्शनी भागात ठेवता येईल. या सहा ग्रंथांसह "भगवंताकडे वाटचाल" आणि "श्री महादेवी स्तोत्र" ही दोन पुस्तकं विनामूल्य दिली जातील. या सर्व संचाची एकत्रित किंमत सवलतीच्या दरात फक्त रु २,७००/- एवढी आहे. सबंध भारतात कुठेही, एवढंच नव्हे तर परदेशीही आपण कळवाल त्या पत्यावर हा संच कुरिअर करू. कुरिअरचे पैसे प्रत्यक्षात जे असतील ते आम्ही आपल्याला कळवू. ते आपल्याला द्यावे लागतील. ठाणे, पुणे आणि चिपळूण इथे ही घरपोच सेवा मोफत उपलब्ध आहे.




नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरुकिल्ली )

गेली दोन वर्ष काका रोज सकाळी सर्वांना जो संदेश पाठवत होते त्या संदेशांचं संकलन म्हणजे ही दोन पुस्तके
आम्ही जेव्हा संकलन सुरू केले तेव्हा साधारण हजार पानांपेक्षा जास्त पानं होत असल्याचं लक्षात आल्यामुळे ही पुस्तके दोन भागात करत आहोत. आता हे दोन्ही भाग प्रकाशित झाले आहेत . यात पहिली ७० पानं हा काकांचा जीवन प्रवास आणि त्यानंतर काका पाठवत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांचे विचार असं या पहिल्या भागाचं स्वरुप आहे. काकांचा जीवनप्रवास खरोखरच अद्भुत आणि अलौकिक आहे. जीवनाच्या प्रत्येक मार्गावर आलेल्या संकटांना स्थितप्रज्ञ राहून कसं तोंड द्यावं याचं उत्तर या जीवनप्रवासात आपल्याला मिळेल. हा जीवन प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकांची अजून एक खासियत म्हणजे आपण पुस्तकाचं कोणतंही पान काढलंत तर आपल्या मनामध्ये त्या दिवशी जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्या पानावर मिळतं.

नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरुकिल्ली ) : भाग - १

Main

( ५६० पाने ) - किंमत रु ३००/-



नित्य चिंतनमाला ( समाधानाची गुरुकिल्ली ) : भाग - २

Main

( २५६ पाने ) - किंमत रु २००/-



अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा

ठाणे : मिलन मुसळे : +91 7506507568 / मीनल मोरबाले : +91 7506507569

पुणे : सुग्रीव शिंदे : +91 9004096935 / हिमांशू जोशी : +91 9004096941

चिपळूण : श्री. संजय चितळे : +91 9420474392

आपण सर्व मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भगवद्गीता पोचवण्याचा संकल्प करूया.
|| हरी ॐ ||



bhagavad gita pravachan, bhagavad gita slokas, bhagavad gita slokas chapter , bhagavad gita slokas audio, bhagavad gita saar , Bhagavad Gita Bodh, Bhagavad Gita online, Bhagavad Gita in Marathi, Srimad Bhagavad Gita , bhagavad gita chintanmala, Adhyaya 1st Shloak, Bhagavad gita chintanmala khand, Bhagavad gita online, Bhagavad Gita online audio

श्रीमद भगवद गीता, भगवद गीता, भगवद गीता श्लोक , भगवद गीता श्लोक अध्याय , भगवद गीता श्लोक ध्वनी , भगवद गीता सार , भगवद गीता बोध , भगवद गीता ऑनलाईन , भगवद गीता मराठी , भगवद गीता चिंतनमाला , भगवद गीता ऑनलाईन ध्वनी , भगवद गीता अध्याय १ ते १८, भगवद गीता चिंतनमाला खंड